Kalamb Lady Death : त्या महिलेचा मृतदेह ज्या घरात सापडला त्या घराबाहेरुन आढावा

Kalamb Lady Death : त्या महिलेचा मृतदेह ज्या घरात सापडला त्या घराबाहेरुन आढावा

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याचे कोणालाही कळू नये, यासाठी बीड पोलिसांकडून एक घाणेरडा कट रचण्यात आल्याचा आरोप मध्यंतरी झाला होता. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामधूनच त्यांची हत्या झाली, असा बनाव रचण्याचा कट पोलिसांनी आखल्याचे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी म्हटले होते. याप्रकरणातील ज्या महिलेशी संतोष देशमुख यांच्याशी अनैतिक संबंध दाखवायचा कट होता, त्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. 

कळंबमध्ये या महिलेचा मृतदेह एका घरात सडलेल्या अवस्थेत मिळाला. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास निर्णायक वळणावर असताना या महिलेचा मृत्यू झाल्याने बीड पोलिसांच्या विश्वासर्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनिषा कारभारी-बिडवे असं मृत महिलेचं नाव आहे. तिच्या डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या महिलेची हत्या अनैतिक संबंधातून झाली, असा दावा पोलिसांनी केला होता. या महिलेच्या हत्येचा आणि संतोष देशमुख प्रकरणाचा काहीही संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती पोलिसांकडून देण्यात आली होती. तसेच  ही महिला पाच वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, अशी माहिती समोर आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola