Gopichand Padalkar :अहिल्यानगर एक्सप्रेसला 'धर्माजीराजे मुंडे एक्सप्रेस' नाव मिळावं, पडळकरांची मागणी
आपलं सरकार आहे. माझे वंजारी बांधव राजकीय प्रगल्भ आहेत. धनगर सध्या राजकीय हिस्सेदारी मागत आहेत. प्रस्थापितांचा जुलमाला गाढायचं असेल तर आपण सोबत येऊ. आपण सोबत आलो की इतिहास घडतो याची साक्ष इतिहास पानापानावर देतो. त्याची पुनरावृत्ती नक्कीच होईल. नवसाजी नाईकांनी पैनगंगा भागात आपलं राजं चालवलं. या नदीवरच्या ईसापूर धरणाला 'आद्यक्रांतीवीर नवसाजीराजे नाईक' नाव द्यावं आणि वंजारी विरांच्या सन्मानासाठी परळी अहिल्यानगर एक्सप्रेसला 'धर्माजीराजे मुंडे एक्सप्रेस' नाव मिळावं. ही मागणी आता मान्य करवून घेऊ.