Fake Suicide Note | बीडच्या विवेक राहाडेची सुसाईड नोट बनावट, खोटं पत्र लिहिणाऱ्याविरोधात तक्रार दाखल
बीडमधील विवेक रहाडे या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येसंदर्भात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येचा फायदा घेण्यासाठी त्याची बनावट सुसाईड नोट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उजेडात आला आहे. विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार केली. ती सुसाईड नोट सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन नमुन्यातून या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर तपासले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags :
Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation