Dowry death Beed | बीडमध्ये हुंडाबळी, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं जीवन संपवलं

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या राजुरी मळा येथे हुंडाबळीची घटना घडली आहे. जंबूरी वस्ती येथील अनिकेत गर्जे याच्यासोबत सोनाली बनवे हिचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या एका महिन्याच्या आत सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी केली. सोनालीच्या माहेरच्या लोकांनी ही रक्कम दिली. मात्र, त्यानंतरही नवर्यासह सासरच्या मंडळींनी सोनालीला वारंवार त्रास दिला. सोनालीने तिच्या आईला आणि माहेरच्या लोकांना या त्रासाबद्दल माहिती दिली होती, परंतु छळ कमी झाला नाही. या सततच्या त्रासाला कंटाळून सोनालीने आत्महत्या केली. या प्रकरणी सासू प्रतिभा गर्जे हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हुंड्यासाठी छळ आणि त्यानंतर विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola