Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?
Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?
Dhananjay Munde & Walmik Karad: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत परळी नगरपरिषद निवडणुकीच्या (Parli Nagar Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीचा भव्य संयुक्तिक कार्यकर्ता मेळावा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे. आज इथे एक माणूस नाही, असे वक्तव्य केले. यामुळे धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) आठवण काढली की काय? अशी चर्चा आता बीडमध्ये रंगली आहे.
धनंजय मुंडे भाषणात म्हणाले की, महायुतीचे सर्व उमदेवार आपण निवडून आणून महाराष्ट्राला दाखवून देऊ. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची, स्वाभिमानाची, अभिमानाची आहे. गेल्या एक वर्षापासून परळीला ज्यांनी बदनाम केले, त्याला उत्तर द्यायचे आहे. दोस्तीमध्ये कुस्ती नाही. मी माझ्या जीवनात कुठलीच निवडणूक सोपी घेतली नाही. परळीकरांचे ऋण मी फेडू शकत नाही. परळीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल. तीर्थक्षेत्र विकासाची कामे परळीत होत आहेत. याच वर्षात ही सर्व कामे करायची आहेत. समोरच्याच व्हिजन आम्हाला माहित नाही. समोरचा माणूस तुतारी घेऊन आला. माझ्यावर अनेक वार झाले, पण मी डगमगलो नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.