Pankaja Munde - CM Shinde : पंकजाताईला धनुभाऊंनी पुढे केलं; शिंदेंच्या एन्ट्रीला स्टेजवर काय घडलं?

Continues below advertisement

बीड : इंडिया आघाडीचं (India Allience) सरकार आल्यावर मोदी सरकारच्या (Modi Government) योजना कॅन्सल करतील, काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीचं (India Aghadi) सरकार राम मंदिरही (Ram Mandir) कॅन्सल करेल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभेत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. PauseUnmute Fullscreen काँग्रेस आणि इंडिया आघाडी राम मंदिरही कॅन्सल करेल इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर हे लोक मोदींची किसान सन्मान निधी योजना कॅन्सल करतील. गरीबांना मोफत रेशन देण्याची योजना कॅन्सल करतील, 55 कोटी गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची योजना देखील काँग्रेस कॅन्सल करेल. इतकंच नाही, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाले राम मंदिरही कॅन्सल करेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram