Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

Continues below advertisement

बीड हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करा ही एकाच मागणी असल्याचं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी सांगितलंय. दरम्यान आज होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 

आरोपीला अटक करा ही एकाच मागणी आमची आहे, आमच्या दुसऱ्या कुठल्याच वेदना आम्ही मांडत नाहीये 

ज्या पद्धतीने आमच्या भावाला संपवलं, कुटुंब पूर्ण पोरकं केलंय 

कुटुंबाला न्याय द्या आणि आरोपीना फाशी द्या एवढीचं अपेक्षा आहे

समाजातील विकृतीनी माझ्या भावाचा घात केला, समाज पूर्ण आमच्या पाठीशी आहे 

समाजाचे, गावाकऱ्यांच्या मनाचा राजा होता माझा भाऊ, प्रत्येक जाती धर्मासोबत ते होते 

सुरु असलेल्या तपासावर आम्ही समाधान नाही, आम्ही यंत्रनेवर विश्वास ठेवला पण अजून आरोपी अटक नाही 

त्यांनी सांगावं अजून अटक का नाही? नेमके कोणाचे अभय आरोपीना आहे

अटक करणे ही सर्वात प्राथमिक गोष्ट आहे पण अजून आरोपी अटक नाही 

कुटुंबातील सदस्य आज बीडच्या मोर्चात सहभागी होतील, आईची तब्येत व्यवस्थित नाही त्यामुळे ते सोबत घेणार नाही 

कुटुंब अजून ही या धक्यातून सावरलेलं नाही, गावचा कुटुंब प्रमुख होता, घरची अवस्था काय असेल याचा विचार करा 

आम्हाला सर्वानी आधार दिलाय पण घरात बसल्यानंतर तुटल्यासारखे वाटतं, एकमेकांकडे बघतो, यातून सवरणे कठीण आहे 

माझा भाऊ कोणी परत आणू शकत नाही, पण जो अन्याय झालंय किमान त्याबाबतीत न्याय तरी द्यावा हे सोडून काय मागावं? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram