Beed Vaijnath Waghmare Attack :अंधारेंच्या विभक्त पतीवर हल्ला,वाघमारेंच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर काल मध्यरात्री बीड जिल्ह्यातल्या होळजवळ हल्ला झाला. वैजनाथ वाघमारे हे आपल्या पुतण्यासोबत होळ वरून आडसकडे कारनं जात होते. तेव्हा काही जण अचानक त्यांच्या कारसमोर आले, आणि दगडफेक सुरू केली. यात वाघमारे आणि त्यांचा पुतण्या जखमी झाले. यापूर्वी आपण अनेक वेळा पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती, मात्र पोलीस संरक्षण न दिल्यामुळेच हा हल्ला झाल्याचं वाघमारे यांनी म्हटलं आहे.  




Beed Vaijnath Waghmare Attack : सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर हल्ला, वाघमारेंच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola