Beed SSC Pass in 11th Attempt : 10 वेळा नापास, 11व्या प्रयत्नात पास! बीडच्या कृष्णाची गावात मिरवणूक
दहावीत 10 वेळा फेला पण 11 व्या प्रयत्नात पठ्ठानं बाजी मारली...हार न मानता पोरानं अकराव्यावेळी 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झाला..
बापाने तर आनंदात गावभर साखर वाटली..गावकऱ्यांनी पठ्ठ्याची वाजत गाजत मिरवणूक काढली..
डोक्यावर फर टोपी. गळ्यात मोठा हार घातलेला हा आहे कृष्णा मुंडे. कृष्णा बीड जिल्ह्यातील परळीचा. मागील 5 वर्षांपासून तो चिकाटीनं दहावीची परीक्षा देतोय. त्याला 10 वेळा अपयश आलं..पण त्यानं आणि त्याच्या वडिलांनी चिकाटी सोडली नाही.. 11 व्या वेळी तो चांगल्या मार्कांन पास झाला..
कृष्णाच्या वडिलांना तर कमालीचा आनंद झाला. बापाने गावभर साखर वाटली.
कृष्णाला मिळालेलं यश पाहून गावकरी देखील खूष झाले. गावकऱ्यांनी कृष्णाचा सत्कार केला..त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली..हे सारं पाहून कृष्णाचे वडिल गहिवरले..मुलाच्या यशावर वडिलांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहुया..