Beed : गेवराईत गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड
बीडच्या गेवराईत गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड टाकण्यात आलीए.. गर्भपातासाठी लागणारे साहित्य आणि औषधंही जप्त करण्यात आलेत.. शिवाय गर्भलिंग चाचणी करणाऱी महिला मनीषा सानप हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. महिलेसोबतचा साथीदार सतीश गवारे हा फरार झाला आहे...याआधीही गर्भलिंगनिदान चाचणी केल्या प्रकरणी संबंधित महिलेवर कारवाई करण्यात आली होती...दरम्यान पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर मनीषा सानप या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...