Beed Politics : Pankaja Munde यांच्याकडे परळी लोकसभा? Dhananjay Munde लढवणार विधानसभा?
झिभाजपा नेत्या पंकजा मुंडे ह्या महायुतीच्या बीडच्या लोक सभेच्या उमेदवार असणार. त्यातच बीडमध्ये आजची अजून एक मोठी घडामोड पाहायला मिळाली.. अशी घडामोड जी फक्त बीडसाठीच नव्हे तर वंजारी समाजाच्या मतदात्यावर, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या भागावर परिणाम करून जाईल. शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र आले.. महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रमांपासून कायम दूर राहणाऱ्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीनं जोरदार चर्चा रंगल्या. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह पंकजा एकाच हेलिकॉप्टरमधून दाखल झाल्या.. अलिकडे पंकजा मुंडे या भाजपच्या कार्यक्रमात फार कमी दिसत होत्या.. मध्य प्रदेशमध्ये प्रचाराची जबाबदारी दिलेली असताना.. त्यांचा महाराष्ट्रातच मुक्काम अधिक पाहायला मिळाला.. कधी भाजपने पंकजा मुंडेंना टाळलं म्हणून उघड नाराजी, तर कधी नाराज पंकजा महाराष्ट्र भाजपला टाळत होत्या. मात्र आजच्या कार्यक्रमात पंकजा अगदी मोकळेपणाने वावरताना पाहायला मिळाला.. यावेळी दोन्ही भावाबहिणींनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळली.. अजित पवार गट आणि भाजप एकत्र आल्यानंतर परळी कोणाची हा कळीचा मुद्दा समोर होता ... या विधानसभा मतदारसंघात दोन भावंडांपैकी कोण निवडणूक लढविणार - पंकजा मुंडे कि धनंजय मुंडे? मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार हि अडचण आताच दूर करण्यात आली आहे. धंनजय मुंडे विधान सभा तर पंकजा मुंडे लोक सभा अशा पद्धतीने इथे भावंडांमधील घातक ठरू वाटणारा वाद शमवण्याचा प्रयत्न आहे.