Beed Police Requirement : पोलीस भरतीची वेबसाईट वारंवार हँग, उमेदवारांना मनस्ताप : ABP Majha

नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने उमेदवारांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय..पुढच्या काही दिवसात राज्यात जवळपास २० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे.. आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. मात्र पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्व्हर डाऊनचा फटका बसतोय. पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार फॉर्म भरण्यासाठी सेंटरवर जातायत. मात्र सर्वर इतके स्लो असल्याने उमेदवारांना फॉर्म भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय..सातत्याने साईट बंद चालू होत असल्याने काही उमेदवारांना इंटरनेट कॅफेमध्ये बसूनच रात्र जागून काढावी लागतेय..त्यामुळे पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी उमेदवारांकडून केली जातेय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola