Beed Car Accident : बीडहून पेडगावच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात, तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Continues below advertisement
बीड शहराजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात झाला, यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. संबंधित कार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडहून पेडगावच्या दिशेने जात होती. भोसरी शिवारात चालकाचं नियंत्रण सुटल, आणि कार तीन वेळा पलटी झाली. अपघात इतका भीषण होती की तीन जण जागीच ठार झाले. धीरज गुंडेचा, रोहन वाल्हेकर आणि विवेक कानगुने अशी मृतांची नावं आहेत. आनंद वाघ या जखमी प्रवाशावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Continues below advertisement