Beed : बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणी जमीनदोस्त
बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणी जमीनदोस्त करण्यात आलीय.. गेल्या काही दिवसांपासून या केंद्रातील संच क्रमांक तीन, चार आणि पाच बंद करण्यात आलेत... हे संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारी सगळी सामग्री भंगारात काढण्याचं काम सुरु आहे... या अंतर्गत नोएडातील ट्विट टॉवरप्रमाणे ही ऐतिहासिक चिमणी पाडण्यात आलीय... इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते. त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती, जी आज इतिहासजमा झालीय..