Beed Hospital Crime : गल्लीतील वाद हाॅस्पीटलपर्यंत पोहोचला; दोन गटांत तुफान हाणामारी
Beed Hospital Crime : गल्लीतील वाद हाॅस्पीटलपर्यंत पोहोचला; दोन गटांत तुफान हाणामारी बीडमधल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अपघात विभागात दोन गटात तुफान हाणामारी झाली. अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांत प्रचंड दहशतीचं वातावरण होतं... रुग्णालयाच्या अपघात विभागात बहुतांशी वेळेस अत्यवस्थ रुग्ण असतात. रविवारी देखील अनेक रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू होते. त्याच वेळी ही घटना झाली...अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठेतील आनंद नगरीत रविवारी सायंकाळी सदर बाजार आणि बारभाई गल्लीतील तरुणात वाद झाला. यावेळी एका तरुणाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमी तरुण स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्या ठिकाणी या दोन्ही भागातील तरुणांमध्ये पुन्हा मोठा वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. या तरुणांना अपघात विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी गोंधळ घालू नये याचंही भान राहिले नाही. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.