Beed Gram Panchayat Elections 2023 : बीडमध्ये 158 जागांसाठी मतदान, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Continues below advertisement
आज राज्यभरात ग्रामपंचायतींचा धुरळा उडणारेय. अनेक भागांत ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सकाळीपासून सुरुवात झालीये. तसंच बीडमध्ये मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा त्यानंतरच आम्ही मतदान करू असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय. त्यानंतर बीड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतीमध्ये आजच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज भरलाच गेला नाही. तसंच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पुढाऱ्यांनी आमच्या गावात येऊ नये अशी भूमिका गावांनी घेतली होती..
Continues below advertisement