Beed Crime Special Report : गन कल्चर मुक्त बीड कधी होणार? हजारो जणांना शस्त्र परवाने कशासाठी ?

Continues below advertisement

Beed Crime Special Report : गन कल्चर मुक्त बीड कधी होणार? हजारो जणांना शस्त्र परवाने कशासाठी ? 

 बीड जिल्हा आहे की गँग ऑफ वासेपूर (Gangs of Wasseypur) सिनेमातील वासेपूर असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. कारण जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत बीड जिल्ह्यात (Beed Crime) 36 खून झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) यांच्या मर्डरचाही समावेश आहे. सरपंच देशमुख यांच्याशिवाय मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे (Sarpanch Bapu Andhale Murder Case) यांचा देखील खून करण्यात आला होता.   बीड जिल्ह्यात 10 महिन्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना  जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत 36 खून झाल्याची नोंद आहे. यात परळीतील सरपंचाच्या खुनाचाही समावेश आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar) नेत्याचाही समावेश होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. याला अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी हा नेता अद्यापही एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना सापडलेला नाही. तसेच खून करण्याचा प्रयत्न  केल्याच्याही 168 घटनाही घडलेल्या आहेत.  गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे 498 गुन्हे 10 महिन्यांत दाखल आहेत. यातील 7 गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत..याशिवाय 156 अत्याचाराच्या 386 विनयभंग झाल्याच्या घटना देखील या कालावधीत समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात महिला, मुली देखील सुरक्षित नाहीत. 10 महिन्यांत अत्याचाराच्या 156 तर विनयभंग, छेडछाडीच्या 386 घटना घडल्या आहेत...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram