Beed Booth Issue : परळीमध्ये मतदानावेळी बूथ कॅप्चरिंग? शरद पवार गटाचा आरोप, तटकरेंचा पलटवार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीड - बजरंग सोनवणे समर्थकाकडून पुन्हा परळी शहरातील मतदानाचे व्हिडिओ व्हायरल बजरंग सोनवणे समर्थकांकडून आरोप
"आकाशात फिरतो पक्षाचा थवा.. बीड जिल्ह्यातच नव्हे तर दिल्लीत सुद्धा असणार पंकजाताईची हवा"
असा मजकूर असलेले फलक मतदान यंत्राच्या बाजूला लावल्याचा व्हिडिओ बजरंग सोनवणे समर्थकांकडून पोस्ट ..
व्हिडिओ पोस्ट करत बजरंग सोनवणे समर्थकांकडून आरोप
बीड जिल्ह्यात बोगस मतदान झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केल्यानंतर अनेक व्हिडिओ समोर आले होते.. विशेष म्हणजे हे व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही ट्विट केले होते.. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक आयोगाकडे हे व्हिडिओ सादर करून बीड जिल्ह्यात काही मतदान केंद्रावर ती फेर मतदान घेण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती..
आता पुन्हा परळी शहरातील एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे ज्या ठिकाणी मतदान यंत्राच्या बाजूलाच पंकजा मुंडे यांच्या संदर्भातील मजकूर असलेले पोस्टर चिटकवण्यात आल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे