#Fraud फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताना सावधान राहा, बनावट अकाऊंटद्वारे फसवणुकीची प्रकरणं वाढली
गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवरुन फसवणूक करण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एखाद्या व्यक्तीच्या फेसबुकवरुन त्याच्या मित्र यादीत असलेल्या लोकांना ऑनलाईन पैसे पाठवण्यासंदर्भात मेसेजस केले जात आहेत. अनेक लोकांना अशा पद्धतीचे अनुभव आले आहेत. आज तर चक्क एका पोलिस अधिकाऱ्याच्याच अकाऊंटचा वापर करुन फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाहुयात यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट.