Nashik | उद्यापासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, मद्यालय सुरू मात्र ग्रंथालयं कधी सुरू होणार? वाचकांचा सवाल
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक 5 च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.