Owesi Rally Ruckus | ओवेसींच्या सभेत तरुणीची मंचावर जात 'पाकिस्तान जिंदाबाद' ची घोषणाबाजी

बंगळुरु : बंगळुरुमधील एका कार्यक्रमात एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या सभेत एका मुलीनं थेट मंचावरुन ओवेसींना आव्हान दिलं. तरुणी माईक हातात घेऊन बोलत असताना ओवेसींसह कार्यकर्त्यांनी मुलीला मंचावरुन खाली उतरवलं. तरुणी 'हिंदुस्थान जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देत होती.  हा सर्व गोंधळ कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, या मुलीला घोषणाबाजी करत असताना स्वत: ओवेसींसह कार्यकर्ते रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणी मंचावरुन बोलण्याचा प्रयत्न करत असताना तिला रोखण्याचे ओवेसी देखील प्रयत्न करत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola