Balasaheb Sanap | बाळासाहेब सानप यांची घरवापसी, सानप यांचा पुन्हा एकदा भाजप प्रवेश
नाशिकचे बाळासाहेब सानप पुन्हा एकदा भाजपवासी झालेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थित सानप यांचा पक्षप्रवेश झाला. २०१७च्या पालिका निवडणुकीत भाजप शहराध्यक्ष म्हणून सानप यांनी भूमिका बजावली होती. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. मात्र त्यानंतर सानप आणि महाजनांमध्ये दुरावा निर्माण झाला.