मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरून मिरवणूक काढत स्वागत! मुला-मुलींमध्ये भेदभाव न करण्याचा कुटुंबाचा संदेश
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या चावरे गावात मुलीच्या जन्मानंतर तिची हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलंय. यावेळी मुलीच्या कुटुंबियांनी गावात पेढे साखरही वाटली आहे. चावरे इथल्या दीपक महाडिक आणि दीपिका महाडिक यांना कन्यारत्न झालं. तिर्था असं तिचं नामकरण करण्यात आलंय. घरांमध्ये मुलीचा जन्म झाल्याने आनंदोत्सव साजरा करत मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करु नका, असा संदेश देण्याचा प्रयत्न महाडिक कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलाय.
Continues below advertisement