Electric Car : फक्त साडेचार लाखांमध्ये इलेक्ट्रिक कार, दिल्ली एनसीआर, मुंबई उपनगरांसाठी उपलब्ध

Continues below advertisement

इलेक्ट्रिक कार म्हटलं तर ती महागडी असणार असा आपल्या सगळ्यांचा समज आहे. पण आता फक्त साडेचार लाखांमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करता येणार आहे. आणि महाराष्ट्रातील चार शहरांमध्ये या कारसाठी प्री-बुकींग सुरुही झालंय. दिल्ली एनसीआर, मुंबई उपनगरांसाठी ही कार उपलब्ध होणार आहे. त्यानंतर पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये ही कार विक्रीस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या तीनचाकी कारचं एक चाक मागे असेल. सध्याच्या थ्री व्हिलरपेक्षा या कारचा लूक एकदम उलटा आहे. 100 ते 150 किमी अंतराच्या रनिंगसाठी ही कार परफेक्ट आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram