Paithan Crime : धक्कादायक! पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात 2 महिलांवर बलात्कार तर लहान बाळाला चटके
औरंगाबादमधुन धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरीसाठी गेलेल्या दरोडेखोरांनी 2 महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात हा धक्कादायक प्रकार घडला असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. दरोडेखोरांनी वस्तीतील लोकांच्या घरातील रोख रक्कम आणि मोबाईलही पळवल्याचे वृत्त आहे. एका महिन्याच्या बाळाच्या हातावर या नराधमांनी चटके ही दिले.