Super Sambhajinagar | औरंगाबादमध्ये 'सुपर संभाजीनगर' बोर्ड, नामांतराचा मुद्दा पेटणार?

Continues below advertisement

 शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या वेळीही सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. आता औरंगाबादमध्ये 'सुपर संभाजीनगर' असा फलक दिसू लागला आहे. औरंगाबाद शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात 'सुपर संभाजीनगर' हा फलक लावला आहे.

शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी संबंधित एनजीओने हा फलक लावला आहे. औरंगाबाद महापालिकेची परवानगी घेऊनच फलक लावल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शहराच्या जुन्या नाण्यांच्या इतिहासासह 'सुपर संभाजीनगर' हा फलकही लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बोर्डसमोरच 'आय लव्ह औरंगाबाद' असा सुद्धा फलक आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram