Sambhajinagar नामांतर निर्णयाला हरकती, सूचना देण्याचा शेवटचा दिवस, भाजपा अर्ज दाखल करणार : ABP Majha
औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या शासन निर्णयाला विरोध होतोय... दरम्यान या निर्णयाला हरकती आणि सूचना देण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे...
यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात आज मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. आज हिंदू एकत्रीकरण समिती, भाजपा मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करणार आहे. तर मुस्लिम समाजाकडून देखील मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे.