औरंगाबाद जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला
नागपुर मुंबई समृद्धी महामार्ग मेपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तशी महिती औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे . औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या 110 किमीची काम प्रगतीपथावर आहेत.हा महामार्ग 1 तारखेपासून सुरू करण्यासाठी मंत्रालय पातळीवरती तयारी सुरू आहे. या महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला जातोय. डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष पाहणी करून नंतर निर्णय घेतला जाईल. या मार्गावरती 150 किलोमीटर वेगमर्यादा असेल. महामार्गावर पन्नास किलोमीटर अंतरावर नागरी सुविधा केंद्र असणार आहेत.