Lockdown in Aurangabad | औरंगाबादमध्ये गर्दी होणाऱ्या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊनचे संकेत
Continues below advertisement
औरंगाबादेत रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्यामुळं गर्दी होत असलेल्या भागत लॉकडाऊन करण्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील जाधववाडी मंडी, गुलमंडी बाजार, कँनॉट परिसर या भागात गर्दी वाढत चालली आहे, आणि रुग्णसंख्याही वाढतेय, लोक नियम पाळतांना दिसत नाही, त्यामुळं या भागांवर आम्ही लक्ष केंद्रीत केल्याचं आयुक्तांनी सांगितलंय. पुढची काही दिवस ही रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर हे भाग बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं आयुक्तांनी सांगितलंय़.
Continues below advertisement