Aurangabad : औरंगाबादेतील धक्कदायक घटना,6 हजारांची उधारी मागितल्यानं हत्या : Abp Majha

Continues below advertisement

मैत्रीच्या  नात्याला काळिमा फासणारी घटना औरंगाबादेत घडली. फक्त सहा हजाराची उधारीची आठवण करुन दिली म्हणून एकानं आपल्या जवळच्या मित्राचीच हत्या केलीए. २ दिवसांपूर्वी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील कृष्णा जाधवची निर्घृण हत्या झाली. मित्राच्या वाढदिवसानिमित्त घराबाहेर पडलेला कृष्णा घरी परतला नाही. फोन लागत नाही, मित्रांकडे विचारपूस करुनही माहिती मिळत नसल्यानं कृष्णाच्या कुटुंबानं पोलिसात धाव घेतली. तर  बहिणीनं फोन ट्रॅकरच्या साहाय्यानं कृष्णाच्या मोबाईलचं लोकेशन शोधलं असता तिथे तिला कृष्णा मृतावस्थेत दिसला. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली असता २४ तासात आरोपी मित्र आनंद टेकाळेनं त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी आनंद टेकाळे या तरुणाला बेड्या ठोकल्यात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram