MNS vs Rahul Gandhi Sabha : मनसेकडून राहुल गांधींची सभा उधळण्याचा इशारा, Sandeep Deshpande म्हणाले

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची आज बुलढाण्यातील शेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आलीय.. काँग्रेसचे दिग्गज नेते या सभेसाठी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेत.. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरुन मनसे आक्रमक झालीय.. राहुल गांधी यांच्या शेगावची सभा उधळण्याचा इशारा मनसेनं दिलाय. शेगाव इथल्या सभेच्या ठिकाणी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून विरोध करणार असल्याचा इशारा मनसेने दिलाय.  मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव शेगावकडे रवाना झालेत... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola