Raj Thackeray : औरंगाबादकरांच्या उरावर रझाकार नव्हे, 'सजा'कारही बसले - राज ठाकरे
Continues below advertisement
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा अशी मागणी राज ठाकरे यांनी आज पत्रकाद्वारे केलीय. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी राज ठाकरे यांनी ही मागणी केलीय. अशी मागणी करतानाच राज ठाकरे यांनी आधुनिक सजाकार असा उल्लेख करत शिवसेनेवर निशाणा साधला. गेली कित्येक वर्षे संभाजीनगर मनपाच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि औरंगाबादकरांना शिक्षा भोगायला लावणारे 'सजा'कार असा उल्लेख राज ठाकरेंनी केलाय.
Continues below advertisement