MNS March against Inflated Power Bills | औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

वाढीव वीज बिलाच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून आता जनतेला न्याय देण्यासाठी आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चे आयोजित केले आहेत. आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्यात निघणाऱ्या या मोर्चामध्ये लाखो लोक सामील होतील असे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेने मोर्चा काढला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola