Aurangabad : MIM च्या रॅलीला मुंबईत No Entry - Abp Majha
Continues below advertisement
औरंगाबादहून निघालेल्या एमआयएमच्या रॅलीला मुंबईच्या वेशीवरच अडवण्याची मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी राजकीय रॅली, सभा आणि तत्सम कार्यक्रमांना बंदी घातली आहे. आणि हेच कारण देत एमआयएमच्या रॅलीला मुंबईत प्रवेश नाकारण्यात येतोय.. मात्र याच निमित्तानं राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात येताहेत...२८ डिसेंबरला राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ओमायक्रॉनचं सावट कायम राहिलं तर त्यांच्या दौऱ्यालाही परवानही नाकारण्यात येणार का या प्रश्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे..
Continues below advertisement
Tags :
Mumbai Rahul Gandhi Aurangabad मुंबई औरंगाबाद राहुल गांधी प्रवेश Omicron मुंबई एमआयएम रॅली MIM Rally Pravesh 28 December