Aurangabad MLC : मविआचे उमेदवार Vikram Kale हे सलग चौथ्यांदा विजय मिळणार
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजय मिळणार असल्याचे चित्र आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण 20 हजार 78 मते पडली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13 हजार 489 मते पडली आहे. तर, शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 543 मते पडली आहे. यावेळी एकूण 2 हजार 485 मते बाद झाली.
Tags :
Candidate Counting Vikram Kale Aurangabad NCP Maviya Teachers Constituency Fourth Time Victory Votes Out