Maharashtra Bandh | मराठवाड्यातही बंद; बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबादमध्ये बाजारपेठा बंद

मराठवाड्यातही वंचित आघाडीच्या बंदला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद हिंगोलीत बंद पाळण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, बाजार पेठा आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. बीडमधील मुख्य मार्केट सुभाष रोड, कारंजा परिसर , शिवाजी नगर , तसंच मुख्य बाजार पेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. हिंगोलीतही बंद पाळण्यात आला.
उस्मानाबादमध्ये मुस्लिम बहुल भागामधील सर्व दुकानं बंद दिसली. आज सकाळपासूनच शहरांमध्ये व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा पोलिसांनी शहरातल्या मुख्य ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola