HSC Maths Exam Paper: छत्रपती संभाजीनगरमध्ये बारावीचा विद्यार्थी उत्तरपत्रिका घेऊन पळाला : ABP Majha

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये बारावीचा गणिताचा पेपर सुरु असताना परीक्षा हॉलमधून विद्यार्थी पळाल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना उस्मानपुरा भागातील नागसेन माध्यमिक विद्यालयामध्ये घडली. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये विद्यार्थी लघुशंका लागली म्हणून पळाला असल्याची प्राथमिक माहिती परीक्षा प्रमुखांनी दिली आहे. परीक्षा केंद्रावरून पळून हा विद्यार्थी थेट अभ्यासिकेत गेला. तिथून त्याच्या मित्रांनी त्याला सेंटरवर परत आणलं. या विद्यार्थ्याची पोलीस आता चौकशी करत आहेत. मात्र, विद्यार्थी कुठलंही उत्तर देत नसल्याची महिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram