Mercy Killing | औरंगाबादेत दोन घोड्यांना दयामरण | ABP Majha

Continues below advertisement
औरंगाबादेत दोन घोड्यांना असाध्य रोग झाल्याने त्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय..या दोघांना ग्लँडर्स नावाचा आजार जडलाय. हा संसर्गजन्य आजार असल्यानं दुसऱ्या जनावरांना या पासुन धोका पोहचू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. या आजाराच्या संक्रमणामुळं प्राणी, आणि संपर्कात आलेल्या माणासाचाही मृत्यू होण्याची भिती असते. या रोगाचं संक्रमण वेगानं वाढत असल्यानं केंद्राच्या कायद्यानुसार या घोड्यांना दयामरण देता येतं, अलीकडच्या काळात राज्यभरातल्या १७ घोड्यांना दयामरण दिलं गेलंय..  खबरदारीचा उपाय़ म्हणून औरंगाबादेत आणखी ८६ घोड्यांची तपासणी केली जाणार आहे. पण घोडामालक आपल्या घोड्यांना दयामरण देण्यासाठी तयार नाहीत. सरकारकडून दयामरणानंतर फक्त २५ हजारांची मदत दिली जाते. ही मदत तुटपूंजी असल्याचा दावा घोडामालकांचा आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram