नियम मोडून विकासकामांचं उद्घाटन, मंत्री संदीपान भुमरे यांचा माफीनामा स्वीकारण्यास हायकोर्टाचा नकार
Continues below advertisement
औरंगाबाद : राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा माफीनामा स्वीकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. लॉकडाऊन काळात विकासकामांचं उद्घाटन करुन कोविडविषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर हायकोर्टात गुरुवारी (13 मे) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या वेळी संदीपान भुमरे यांनी बिनशर्त माफीनामा सादर केला. मात्र न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांनी संदीपान भुमरे यांचा माफीनामा स्वीकारला नाही. तसंच न्यायालयाने संदीपान भुमरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असा दत्तात्रय गोरडे यांनी सादर केलेला दिवाणी अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.
Continues below advertisement