MahaShivratri | घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलीय. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला असल्यानं या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते.. महाशिवरात्रीनिमित्त राज्याच्या विविध भागातून तसंच गुजरात आणि मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येनं इथं दाखल झालेत.