Web Exclusive | औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील आठ गावांवर सुलतानी संकट!
Continues below advertisement
मराठवाड्यावर आलेलं अस्मानी संकट आपण पाहिलं पण औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील आठ गावांवर सुलतानी संकट आलां. त्याचं झालं असं हिलालपूर, कोरडगाव ग्रामपंचायतीने कोरडगाव भागात असलेला पाझर तलाव फुटेल अशी तक्रार वैजापूर तहसीलदारांकडे केली. वैजापूर तहसीलदारांनी देखील पाटबंधारे विभागाला तात्काळ दखल घेण्याच्या सूचना करत तलाव फुटला तर आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असं पत्र लिहले. मात्र, पुढे 18 दिवस यावर पाटबंधारे विभागाने कुठलेही पाऊल उचलले नाही आणि 27 तारखेच्या अतिवृष्टीत हाताला वाहून गेला. त्यामुळे आठ गावातील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झालं.
Continues below advertisement