Bindas Kavya : वडील रागावल्यामुळे घर सोडून गेली प्रसिद्ध यूट्यूबर काव्या, नेमकं काय घडलं?

औरंगाबादची प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या. शुक्रवारी अचानक बेपत्ता झालेली बिंदास काव्या मध्य प्रदेशातील इटारसीमध्ये सापडली... बिंदास काव्या औरंगाबादमधून अचानक बेपत्ता झाल्याने तिचे आई वडील हैराण झाले होते... काव्याचा बराच शोध घेऊनही ती सापडत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांनी तिला घरी परतण्याचं आवाहन केलं होतं. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.. अखेर मनमाडहून भोपाळला जात असताना मध्य प्रदेशातील इटारसीमध्ये बिंदास काव्या पोलिसांना सापडलीय... वडील रागावल्यामुळे घर सोडून गेल्याचं बिंदास काव्याने सांगितलंय... दरम्यान बिंदास काव्या ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.  तिचे यूट्यूबवर तब्बल ४३ लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत.  काव्या बेपत्ता झाल्यानंतर यूट्युबवर तिचे ३० हजार सबस्क्राईबर वाढलेत..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola