Aurangabad : धक्कादायक! कोरोनाचा उद्रेक होत असताना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 61 व्हेंटिलेटर बंद

कोरोनाचा उद्रेक होत असताना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 61 व्हेंटिलेटर बंद असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अतिविशेषोपचार विभागासह अन्य विभागातील व्हेंटिलेटर दुरुस्तीअभावी बंद आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घाटी रुग्णालयात जाऊन बैठक घेतली आणि ऑक्सिजन प्लांटचीही पाहणी केली. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच रुग्णालयातील नादुरुस्त उपकरणं तातडीनं दुरुस्त करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola