CM Uddhav Thackeray : तक्रारदार गायब आहेत, तरी खोदून खोदून चौकशी सुरू, मुख्यमंत्र्यांचा निशाणा
CM Uddhav Thackeray : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे ‘ब’ आणि ‘क’ टप्प्याचे उद्घाटन आज शनिवारी देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरण रिजुजू यांचीही उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यायिक प्रक्रिया आणि कायद्यासंदर्भात बोलतानाच अनेक विषयांवर भाष्य केलं. केंद्र सरकारवर आणि परमबीर सिंग यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली.