Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमधला एक २३ वर्षांचा तरुण... ज्याचा पगार आहे फक्त १३ हजार रुपये. पण त्यानं चार महिन्यांपूर्वी बीएमडब्ल्यू कार घेतली. शहरात आलिशान फोर बीएचके फ्लॅट घेतला आणि गर्लफ्रेंडला गिफ्ट केला. ३५ लाखांचा डायमंडचा चष्मा केला. आता तुम्ही म्हणाल १३ हजार कमावणाऱ्या कर्मचाऱ्याला हे कसं शक्य आहे? पण हे घडलंय. या तरुणानं तब्बल २१ कोटी ५९ लाख रुपयांचा घोटाळा केला आणि त्यातून या सगळ्या भानगडी केल्या. संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी तत्वावर लिपिक म्हणून काम करणारा हर्षलकुमार क्षीरसागर या घोटाळ्याचा मास्टरमाईंड आहे. त्यानं इंटरनेट बँकिंग आणि बनावट सह्या करुन क्रीडा विभागाचं अख्खं अकाऊंट खाली केलं.हर्षलकुमारसह अन्य दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही या प्रकरणात समावेश होता. त्यांना अटक करण्यात आली आहे. पण मुख्य आरोपी हर्षलकुमार फरार आहे.
Continues below advertisement