Chhatrapati Sambhaji Nagar : पंचनाम्याची घोषणा ! पण साहेबच बांधावर दिसेना

Continues below advertisement

राज्यातल्या शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट येऊन कोसळलंय.... एकीकडे डोक्य़ावर धो धो कोसळणारा पाऊस थांबायचं नाव घेत नाहीए... तर दुसरीकडे डोळ्यासमोर पिकांची माती पाहून पोशिंद्याच्या डोळ्यात अश्रूचा बांध फुटलाय...  अस्मानी संकटातून बळीराजाला पंचनामे सावरतीलही.. पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तिथंही बळीराजाच्या पदरी निराशा आलीए... कारण जेवढं नुकसान झालंय, त्याच्या केवळ दोन टक्के पंचनामे झाल्याचं समोर आलंय.  मराठवाड्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले असून, आतापर्यंत फक्त 1 हजार 384 हेक्टरचे पंचनामे झाले आहे.  नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय... टपोरी द्राक्ष आणि संत्री बागा उद्ध्वस्त झाल्यात....  पावसामुळे द्राक्षासह शेतीमालाचं अतोनात नुकसान झालंय...रद्दी पेपरपेक्षाही द्राक्षांना कवडीमोल भाव मिळत असल्याचं चित्र आहे... त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय..  तिकडे नागपूर जिल्ह्यात  शेतकऱ्यांच्या नुकसानाचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत... शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे... १५ दिवसानंतर काय नुकसान दिसणार असा सवाल शेतकरी विचारतायत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram