
Buddha Purnima : बुद्ध पौर्णिमेनिमित्त औरंगाबादेत कलाशिक्षकाने पिंपळाच्या पानावर रांगोळी रेखाटली
Continues below advertisement
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद येथील कर्मवीर श्री शंकर सिंग नाईक हायस्कूलमधील कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून गौतम बुद्धांची रांगोळी काढून आपल्या कलेच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. संपूर्ण जगात पिंपळाच्या पानावर गौतम बुद्धांची रांगोळी रेखाटण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद घेतली गेली आहे. आपल्या हाताच्या तळव्या एवढ्या पिंपळाच्या पानावर ही रांगोळी रेखाटली गेली असून तीन तासाचा अवधी लागून 35 ग्राम रांगोळीचा उपयोग रांगोळी रेखाटण्यासाठी करण्यात आला आहे.
Continues below advertisement