रस्ता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास देतोय; औरंगाबादमध्ये महिलेची चक्क रस्त्याविरोधात तक्रार

Continues below advertisement

आपण अनेक तक्रारीचे प्रकार पाहिले असतील, परंतु कोणी रस्त्याच्या विरोधात तक्रार केल्याचे ऐकिवात नसेल. पण औरंगाबादेत अशीच एक तक्रार झाली आणि तीही एका महिलेने केली आहे. औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे यांनी चक्क रस्त्याविरोधात पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. राज्यातील अनेक रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. त्यातूनच अनेक चाकरमान्यांना प्रवास करीत आपल्या इच्छित स्थळी पोहोचायला वेळ लागतो.

संध्या मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या 14 वर्षांपासून त्या औरंगाबाद ते फुलंब्री रस्त्यांने अप-डाऊन करतात. त्यामुळे त्या रस्त्याच्या प्रवासाला कंटाळल्या आहेत. औरंगाबाद ते फुलंब्री हा तीस किलोमीटरचा रस्ता. गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबाद जळगाव रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे असंख्य त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. याच कामाचा कंत्राटदार काम सोडून गेला. रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने तब्बल एक वर्ष नागरिकांचे हाल सुरू होते. संध्या मुंडे तर गेल्या 14 वर्षांपासून या रस्त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram