HSC Exam | पेपर सोडवण्यात मदत करणाऱ्या शिक्षकांना अटक | औरंगाबाद | ABP Majha

औरंगाबादेत विद्यार्थ्याला पेपर सोडवण्यात मदत करणाऱ्या केंद्रप्रमुखांसह शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
वाळूजमधील गजानन कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घ़डलाय. दरम्यान आज पहिल्याच दिवशी राज्यभरात ८२ ठिकाणी गैरप्रकार आढळून आलेत. यामध्ये सर्वाधिक कॉपीचे प्रकार असून लातूर जिल्ह्यात एकूण ३४ ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं भरारी पथकानं सांगितलंय.
लातूरपाठोपाठ नाशिकमध्ये १८, जळगावमध्ये 7 तर नंदुरबारमध्ये 2 ठिकाणी कॉपीचे प्रकार उघडकीस आलेत. बोर्डात सातत्यानं नंबर वन राहणाऱ्या कोकण विभागातून कोणतेही गैरप्रकार समोर आले नाही, हे विशेष.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola