Coronavirus | कोरोनाच्या भीतीने औरंगाबादमधील शिवजयंतीच्या कार्यक्रमांना परवानगी नाही

कोरोनाबाबत औरंगाबादेतही सतर्कता पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी उद्याच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या औरंगाबादेत आहेत. उद्या सकाळी क्रांती चौकातल्या शिवरायांच्या पुतळ्याल राज ठाकरे अभिवादन करणार आहेत. तर, शिवसेनेक़डूनही उद्या औरंगाबादेतल्या सर्व शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. पण शिवसेनेला रॅली न काढण्याचंही आवाहन पोलिसांनी केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola